कणकवली वागदे येथे कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू


गोव्याच्या दिशेने जात असलेल्या कारची महामार्गनजिक असलेल्या पादचाऱ्याला धडक बसली. वागदे – गावठणवाडी येथे गुरुवारी सायंकाळी ७ वा. सुमारास झालेल्या या अपघातात विश्वनाथ लवू गावडे (४०, वागदे – गावठणवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती समजताच वागदे सरपंच संदीप सावंत व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी पाहणी केली असता विश्वनाथ हे जागीच मृत्युमुखी पडले होते. अपघाताची माहिती समजताच कणकवली पोलीसही घटनास्थळी दाखल झाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button