
भोस्ते गावात दीड दिवसांच्या गणपती विसर्जनावेळी बुडालेल्या मंगेश पाटील याचा मृतदेह अखेर सापडला
*खेड तालुक्यातील भोस्ते गावात दीड दिवसांच्या गणपती विसर्जनावेळी एक दुर्दैवी घटना घडली. काल (गुरुवार) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गणपती विसर्जन करताना नदीपात्रात बुडून मंगेश पाटील या तरुणाचा मृत्यू झाला
सायंकाळी सहा वाजल्यापासून एन डी आर एफ ,पोलीस प्रशासन आणि नगरपंचायत खेड प्रशासन यांच्या माध्यमातून शोधकार्य सुरू केले होते. अखेर शुक्रवार दिनांक २९ रोजी सायंकाळी चार वाजता दुर्दैवी मंगेश पाटील याचा मृतदेह भोस्ते येथेच सापडल्याची माहिती प्रांताधिकारी वैशाली पाटील यांनी दिली. ऐन गणेशोत्सवाच्या काळात युवकाचा बुडून मृत्यू झाल्यामुळे कुटुंबीय आणि ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे.