
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कारवाईमध्ये “गोवंश वाहतूक करणाऱ्या तीन इसमांवर कारवाई”.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव दरम्यान गोवंश वाहतूक व कत्तल संदर्भातील गुन्ह्यांना प्रतिबंध व कारवाई करण्याचे तसेच त्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने मा जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे वअपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यानी सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना सूचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने दिनांक २८ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक लाजा उपविभागा मध्ये गस्त करत असताना ओणी ते पाचल मार्ग अणुस्कुरा घाटातून गोवश जातीच्या जनावरांची वाहतूक होणार आहे अशी विश्वसनीय बातमी मिळाल्याने हे पथक रायपाटण येथे वाहनांची तपासणी करण्याकरिता दि. 29/08/2025 टोजी 03.30 वाजता थांबले व वाहनांची तपासणी करीत असताना 05.55 वाजता एक महींद्रा कंपनीची जीनीओ मॉडेलचे चारचाकी वाहन क्रमांक MH-04-FP-6424 व त्या पाठोपाठ आयशर प्रो-1059 मॉडेलये चारचाकी वाहन क्रमांक MH-07-X-1511 ही वाहने थांबवून त्याची तपासणी केली असता महींद्रा कंपनीची जीनीओ मॉडेल चारचाकी वाहन क्रमांक MH-04-FP-6424 या वाहनाच्या हौद्यामध्ये 8 गोवंश जातीची जनावरे तसेच आयशर प्रो-1059 मॉडेलचे चारचाकी वाहन क्रमांक MH-07-X-1511 या वाहनाच्या हौद्यामध्ये 11 गोवंश जातीची जनावरे अशी एकूण 19 जनावरे यांना दोरी च्या सहाय्याने दाटी वाटीने जवळ-जवळ बांधलेले मिळून आले.
या दोन्ही गाडीतील गोवंश जनावरांना गाडीतील हौदयात पाणी न देता गाडीमध्ये वेदना किंवा यातना होतील अशा रीतीने दोरीने बांधून तसेच त्यांच्या खाद्याची कोणतीही व्यवस्था न करता, त्यांच्या कत्तलींकरिता वाहतूक करीत असताना मिळून आले म्हणून या गोवंश जनावरांच्या दोन्ही गाडीच्या चालकांकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे गोवंश जनावरे वाहतुकीचा परवाना अगर पशु-वैद्यकीय अधिकाऱ्याकडून वैद्यकीय तपासणी केली नसल्याचे त्यांनी सांगीतले म्हणून दोन पंचासमक्ष नाव-गाव विचारले असता चालकांनी आपली नावे 1) विनायक मनोहर भोईटे, बर्ष 38 वर्षे, रा. पांगरी रोड, रेणुकानगर, निपाणी, शिरगुप्पी, ता. चिकोडी, जि. बेळगावी, राज्य कर्नाटक (महींद्रा कंपनीची जीनीओ मॉडेलचे चारचाकी वाहन क्रमांक MH-04-FP-6424 वरील चालक) व 2) समीर बाळासो मुजावर, वय 31 वर्षे, रा. वॉर्ड नं. 24, कारंडेमळा, गल्ली नं. 3, शहापुर इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर (आयशर प्रो-1059 मॉडेलये चारचाकी वाहन क्रमांक MH-07-X-1511 वरील चालक) असे सांगितले तसेच या दोन्ही इसमांकडे गोवंश जनावरे कोठून आणली याबाबत विचारणा केली असता त्यांनी ही गोवंश जनावरे 3) तबरेज चाँदनीयाँ ठाकुर ना. परटवली, ता. राजापुर, जि. रत्नागिरी यांच्याकडून आणल्याचे सांगितले




