
न्यूझीलंड मधील ऑकलंड मध्ये मराठमोळ्या नामजोशी कुटुंबात गणपती बाप्पा विराजमान
भारतीय वंशाचे असलेले मूळचे ठाणे कळवा येथील रहिवासी मात्र नोकरीच्या निमित्ताने न्यूझीलंड मध्ये स्थायिक झालेल्या मानसी नामजोशी यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले. मागील सात वर्षे परदेशात राहूनही आपली मूळ परंपरा नामजोशी अखंडितपणे जपत आहेत. कोकणात गणेशोत्सव काळात त्यांना इकडे येणें शक्य होत नसल्याने लाडक्या बाप्पाची सेवा त्या परदेशात राहून देखील अगदी भक्ती भावने करतात.




