
आयटीआय दापोली आयएमसीसाठी तात्पुरत्या स्वरुपात लिपिक टंकलेखक३ सप्टेंबरपर्यंत अर्ज करा
रत्नागिरी, दि. 28 : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दापोली येथे केंद्र शासन पुरस्कृत पब्लिक प्रायव्हेट पार्टनशिप अंतर्गत संस्था व्यवस्थापन समिती (आयएमसी) च्या कामकाजाकरिता तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्वावर लिपिक टंकलेखक नेमण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सचिव, आय. एम.सी. द्वारा शासकीय औद्यौगिक प्रशिक्षण संस्था दापोली, मु. पो. जालगांव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, ता.दापोली, जि. रत्नागिरी 415712 या संस्थेच्या पत्त्यावर 3 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत (शासकीय सुटटी वगळून) सादर करावेत, असे एम.बी. गवई, सचिव, आय.एम.सी ऑफ आयटीआय दापोली यांनी कळविले आहे.
या पदासाठी वयोमर्यादा 21 ते 38 वर्ष असून शैक्षणिक अर्हता पदवीधर, एमसीआयटी, टॅली, टंकलेखन मराठी-इंग्रजी असणे आवश्यक आहे. किमान दोन वर्षाचा शैक्षणिक अर्हतेनुसार अनुभव व ऑनलाईन कामकाज हाताळण्याचे ज्ञान आवश्यक आहे. दरमहा 12 हजार रुपये मानधन देण्यात येईल. कार्यालयीन कामकाजाकरिता प्रवास करावा लागेल. नियुक्तीचा कालावधी 11 महिने राहिल व त्याबाबतचे बंधपत्र देणे अनिवार्य राहिल. कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारास समान संधी मिळेल. कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्याविषयी तरतूद नाही. अनुभव प्रमाणपत्र अथवा सेवेत कार्यरत असलेला कोणताही दाखला अथवा प्रमाणपत्र देण्यात येणार नाही. आपली सेवा असमाधानकारक असल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता आपली सेवा समाप्त करणेत येईल.