
गणेशोत्सवाच्या आनंदात बत्ती गुल नाही…
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाचे आगमन काही तासांवर आले असून येणारा गणेशात्सव आनंददायी व निर्विघ्न पार पाडावा यासाठी महावितरणने देखभाल दुरूस्तीची अनेक कामे केली आहेत. तसेच आपत्कालीन स्थितीत वीज पुरवठा खंडीत झाल्यास आवश्यक असणारे साहित्य व मनुष्यबळ शाखा कार्यालयापर्यंत उपलब्ध ठेवण्याचे तसेच अधिकारी व कर्मचारी यांना परवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याचे आदेश महावितरणकडून देण्यात आले आहेत.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव मोठा उत्साहात साजरा केला जातो. या वेळी वीज पुरवठा खंडीत होवू नये म्हणून महावितरणने दोन्ही जिल्ह्यात देखभाल दुरूस्तीची विशेष मोहीम राबविली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४९ नादुरूस्त रोहित्रे बदलली, ७२ वितरण पेट्या बदलल्या, वीज वाहिन्या पुटून अपघात होवू नये म्हणून १०,८२५ स्पेसर्स बसवले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात २३ वितरण पेट्या बदलल्या असून वीज वाहिन्या तुटून अपघात होवू नये म्हणून २३०० स्पेसर्स बसवले आहेत. १५८ पोल बदलले तसेच लघुदाब व उच्चदाब वाहिन्यांच्या शेजारी असणार्या व वीज यंत्रणा प्रभावित करणार्या वृक्षांची छाटनी केली आहे. यामुळे गणेशोत्सव काळात नागरिकांना अखंड वीज पुरवठा मिळण्यास मदत होणार आहे.
www.konkantoday.com




