
मिरकरवाडा बंदरात जेट्टी क्रमांक २नौकांचे अवशेष / सांगाडे संबंधित नौकाधारकांनी 2 सप्टेंबरपर्यंत स्वखर्चाने काढून टाकावे
रत्नागिरी, दि. 25 : मिरकरवाडा बंदरात जेट्टी क्रमांक २ (स्थानिक भाषेतील समीना जेट्टी) व जेट्टी क्रमांक ३ (स्थानिक भाषेतील डिझेल जेट्टी) या ठिकाणी नौकांचे मोडलेल्या स्थितीत असलेल्या बुडालेल्या व नष्ट झालेल्या नौकांचे इंजिन व इतर पार्टस काढून घेऊन कोणतेही मूल्य न येणारे असे नौकांचे सांगाडे/अवशेष बंदर सोडून दिले आहेत. त्यामुळे बंदरातील इतर नौकांना नौकानयनासाठी अडथळा निर्माण झाला आहे. तरी संबंधित नौकांचे अवशेष / सांगाडे संबंधित नौकाधारकांनी दिनांक 2 सप्टेंबर रोजी पर्यंत स्वखर्चाने काढून टाकावे, अन्यथा विभागामार्फत नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे मत्य्ोव्यवसाय विकास अधिकारी अक्षया विनोद मयेकर यांनी कळविले आहे.
मुदतीत संबधितांनी त्यांच्या नौकांचे सांगाडे/अवशेष न हटविल्यास ते प्रशासनामार्फत हटवले जातील व या कारवाई करिता होणारा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल. तसेच भविष्यात संबधित नौकाधारकांना कोणत्याही नुकसान भरपाईचा दावा करता येणार नाही व होणाऱ्या नुकसानास शासन जबाबदार राहणार नाही, याची नोंद घ्यावी.
00




