
जिल्हा प्रशासनाच्यावतीने मुंबई गोवा महामार्गावर उभारण्यात आलेल्या मदत केंद्राची जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी केली पाहणी

रत्नागिरी- गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या कोकणवासीयांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने मुंबई गोवा महामार्ग विविध ठिकाणी मदतकेंद्र स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक मदत केंद्रावर महसूल, पोलीस, आरोग्य विभागाचे कर्मचारी २४ तास उपलब्ध असणार आहेत. अशाच संगमेश्वर येथील एका मदतकेंद्राला जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी काल रात्री भेट देऊन आढावा घेतला व योग्य सूचना दिल्या.




