पालकमंत्री ना. सामंत ह्यांनी केली खडपोली पुलाची पाहणी

पुलासाठी MIDC कडून ₹ 35 कोटी मंजूर करण्याची केली घोषणा

चिपळूण खडपोली येथे पुलाला अतिवृष्टीमुळे तडा जाऊन वाहतूक बंद झाली आहे. आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी या दुर्घटनेची पाहणी करून माध्यमांशी संवाद साधला.

पुलामुळे स्थानिक नागरिक, उद्योग आणि MIDCतील उद्योजकांना होणारा त्रास तात्काळ कमी व्हावा यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, MIDC अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाला दिले.

मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी १५ दिवसांत टेंडर प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. खेडच्या पुलासाठी वापरलेली जलद बांधकाम तंत्रज्ञान वापरून हा पूलही त्वरित उभारण्याचे निर्देश दिले असून या पुलासाठी लागणारा अंदाजे ३४-३५ कोटी रुपयांचा संपूर्ण निधी MIDC मार्फत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर मागील छोटा पूलही या योजनेत समाविष्ट करून दोन्ही पुलांची कामे पूर्ण केली जातील. तसेच, MIDC परिसरात रस्त्यांचे रुंदीकरण करून वाहतूक सुरळीत करण्याचे आदेश मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button