
रत्नागिरी तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रसाद उपळेकर यांची निवड
रत्नागिरी : तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी सर्वानुमते प्रसाद उपळेकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे उपनेते, माजी आमदार बाळ माने यांनी अभिनंदन केले.
यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, विभाग प्रमुख राजाराम रहाटे, शहर संघटक प्रसाद सावंत, सलील डाफळे, नितीन तळेकर, प्रशांत सुर्वे, सचिन शिवलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.




