
’आभार ’चा ’रत्नभूषण पुरस्कार’ उदय सामंत यांना जाहीर, शनिवारी वितरण सोहळा होणार
रत्नागिरीच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या ’आभार’ संस्थेचा आठवा ’रत्नभूषण पुरस्कार २०२२’ यंदा पालकमंत्री उदय सामंत यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याचे संस्था सल्लागार डॉ. दिलीप पाखरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या संस्थेतर्फे आयोजित ’गुरुगौरव व रत्नभूषण पुरस्कार सोहळा’ येत्या शनिवारी, २३ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता स्वयंवर मंगल कार्यालय, माळनाका, रत्नागिरी येथे होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेवेळी अध्यक्ष विनोद हळदवणेकर, सचिव वासुदेव वाघे हे देखील उपस्थित होते. या सोहळ्यात सामंत यांना मान्यवरांच्या हस्ते ’रत्नभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. याचवेळी जिल्ह्यातील वयोवृद्ध भजनी कलाकारांना ’गुरुगौरव सन्मान’ देऊन त्यांच्या योगदानालाही गौरवण्यात येणार आहे.
आभार सांस्कृतिक कला/क्रीडा मंडळ, रत्नागिरी आणि रत्नागिरी जिल्हा प्रासादिक भजन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष विनोद हळदवणेकर, भजन मंडळ अध्यक्ष साईनाथ नागवेकर, आणि सर्व पदाधिकारी व सदस्यानी या कार्यक्रमात सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.www.konkantoday.com