
खासदार सुनिल तटकरे यांना लंडन येथे ’भारत भूषण’ पुरस्कार प्रदान
रायगड रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि केंद्रीय इंधन समितीचे अध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांना दैनिक ’लोकमत’ या आघाडीच्या वृत्तपत्राने आयोजित केलेल्या ग्लोबल इकॉनॉमिक कनव्हेशनमध्ये त्यांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक, नाट्य, साहित्य अशा विविध प्रकारच्या क्षेत्रात उल्लेखनीय आणि प्रभावी योगदानाची दखल घेऊन बहुआयामी व्यक्तीमत्व खासदार सुनिल तटकरे यांना प्रतिष्ठीत अशा ’भारत भूषण’ पुरस्काराने लंडन येथे गौरविण्यात आले.
www.konkantoday.com