
रुग्णाच्या उपचारा दरम्यान मृत्यूप्रकरणी चौकशी समिती गठीत
रत्नागिरी, दि. २२ : नरेंद्र शंकर आंबेकर (वय ४८, रा. गोळप, ता. रत्नागिरी) यांच्या उपचारादरम्यान झालेल्या मृत्यू प्रकरणी त्यांच्या नातेवाईकांनी आपत्कालीन विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. या आरोपांची दखल घेत सखोल चौकशी करण्यासाठी वैद्यकीय अधिष्ठाता डाॕ जयप्रकाश रामानंद यांनी वैद्यकीय अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे.
उपचारादरम्यान रुग्ण आंबेकर यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाईकांनी आपत्कालीन विभागातील त्यावेळी कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांच्यावर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. यानंतर अधिष्ठाता डाॕ रामानंद यांनी तातडीने पावले उचलत चौकशी समिती गठीत केली. ही समिती या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असून, चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालातील निष्कर्षांवर आधारित पुढील योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.




