
गणेशोत्सवानिमित्त गणपतीपुळेत श्रींच्या मंदिरात विविध कार्यक्रम
गणेशोत्सवानिमित्त गणपतीपुळे श्रींच्या मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन संस्थानच्यावतीने करण्यात आले आहे. २४ ते २८ ऑगस्ट दरम्यान कार्यक्रम होणार असुन ४ सप्टेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
२४ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० ते ११.३० दरम्यान श्रींची महापूजा व प्रसाद, २५ रोजी सकाळी ११ ते १२ दरम्यान सहस्त्र मोदक समर्पण, २४ ते २८ दरम्यान दररोज सकाळी ७ ते ७.३० वाजता आरती व पुष्पमंत्र तर दररोज सायंकाळी ७.३० ते ९.३० वाजता ह.भ.प. व वेदश्री वैभव ओक (डोंबिवली) यांचे कीर्तन, २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ ते ६ दरम्यान श्रींची पालखी व मिरवणूक (प्रदक्षिणा) होणार आहे. तर ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ दरम्यान महाप्रसाद होणार आहे.
या कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे श्रीदेव गणपतीपुळे संस्थान यांच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com




