
संगमेश्वर तालुक्यातील कनकाडी गराटेवाडी येथील युवकाची गळफासाने आत्महत्या
संगमेश्वर तालुक्यातील कनकाडी गराटेवाडी येथील १७ वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आली. हर्षद संजय रांदिम असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
हर्षद सांदिम व त्याचे वडील संजय सांदिम हे कामानिमित्त सांगली येथे राहत होते. गावाकडे आजी, आई व लहान बहिण वास्तव्यास असतात. हर्षद हा हरहुन्नरी युवक होता. गणपती, शिमगा, मे महिन्याच्या सुट्टीत तो आवर्जुन कनकाडी गराटेवाडी गावी येथून मित्रांसोबत मौजमजा करत असे. दोन दिवसापूर्वी हर्षद हा सांगलीहून गावी आला होता. सांदिम याची गावात दोन घरे आहेत. जुन्या घरात आजी, आई व लहान बहिण झोपी गेली. जेवण झाल्यानंतर हर्षद हा नवीन घरामध्ये १० वाजता झोपायला गेला.
बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास वर्षद याची आई त्याला उठविण्यासाठी गेली. मात्र आतून त्याने कोणताच प्रतिसाद दिला नाही. आत पाहिल्यानंतर हर्षद हा गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला. हे दृश्य पाहताच आईने हंबरडा फोडला. या घटनेची खबर गावचे पोलीस पाटील समीक्षा खांदारे यांची साखरपा दूरक्षेत्रात दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी हर्षद याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.www.konkantoday.com