
मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाची प्राथमिक फेरी उत्साहात

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने दक्षिण रत्नागिरीची प्राथमिक फेरी (झोनल राऊंड) भारत शिक्षण मंडळाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात उत्साहात पार पडली. संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या चार तालुक्यांतील १६ महाविद्यालयातून जवळपास ७५० विद्यार्थी सहभागी झाले होते.
प्राथमिक फेरीचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक नीलेश सावे, भारत शिक्षण मंडळ संस्थेच्या कार्याध्यक्षा नमिता कीर, भारत शिक्षण मंडळ संस्थेचे कार्यवाह सुनील वणजू , रत्नागिरी जिल्हा समन्वयक डॉ. आनंद आंबेकर, सह समन्वयक प्रा. ताराचंद ढोबळे, भारत शिक्षण मंडळाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले .
यावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा निकाल असा : भारतीय शास्त्रीय गायन (एकल) : प्रथम क्रमांक गोगटे – जोगळेकर कॉलेज (रत्नागिरी ), द्वितीय क्रमांक कीर लॉ कॉलेज (रत्नागिरी). शास्त्रीय वाद्य (एकल) तालवाद्य : प्रथम क्रमांक गोगटे-जोगळेकर कॉलेज. शास्त्रीय वाद्य (एकल) स्वरवाद्य :, प्रथम क्रमांक फिनोलेक्स अकॅडमी (रत्नागिरी), द्वितीय क्रमांक गोगटे -जोगळेकर कॉलेज, इंडियन लाईट वोकल (एकल) : द्वितीय क्रमांक गोगटे -जोगळेकर कॉलेज. भारतीय समूह गायन : प्रथम क्रमांक गोगटे-जोगळेकर कॉलेज, द्वितीय क्रमांक फिनोलेक्स अकॅडमी (रत्नागिरी), तृतीय क्रमांक कीर लॉ कॉलेज. पाश्चात्य समूह गायन : तृतीय क्रमांक कीर लॉ कॉलेज.भारतीय शास्त्रीय नृत्य : उत्तेजनार्थ फिनोलेक्स अकॅडमी (रत्नागिरी).भारतीय लोकनृत्य :प्रथम क्रमांक गोगटे-जोगळेकर कॉलेज, द्वितीय क्रमांक आठल्ये-सप्रे-पित्रे कॉलेज, तृतीय क्रमांक संगमेश्वर नवनिर्माण कॉलेज.
वक्तृत्व स्पर्धा (मराठी) : द्वितीय -कला, वाणिज्य आणि विज्ञान लांजा कॉलेज , उत्तेजनार्थ – भारत शिक्षण मंडळाचे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स सीनियर कॉलेज (रत्नागिरी). उत्तेजनार्थ -गोगटे-जोगळेकर कॉलेज.वक्तृत्व स्पर्धा (इतर भाषा) : तृतीय क्रमांक -कीर लॉ कॉलेज ,उत्तेजनार्थ -गोगटे-जोगळेकर कॉलेज, उत्तेजनार्थ – फिनोलेक्स अकॅडमी (रत्नागिरी). वादविवाद स्पर्धा (मराठी) : प्रथम -भारत शिक्षण मंडळाचे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, द्वितीय क्रमांक –एल .एस .पेजे कॉलेज , तृतीय क्रमांक -कीर लॉ कॉलेज.वादविवाद स्पर्धा (इतर भाषा) : प्रथम क्रमांक -कीर लॉ कॉलेज, द्वितीय क्रमांक –गोगटे-जोगळेकर कॉलेज, तृतीय क्रमांक -भारत शिक्षण मंडळाचे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज.कथाकथन स्पर्धा (मराठी) : प्रथम क्रमांक – गोगटे-जोगळेकर कॉलेज, द्वितीय क्रमांक – फिनोलेक्स अकॅडमी (रत्नागिरी), तृतीय क्रमांक – आठल्ये-सप्रे-पित्रे कॉलेज.कथाकथन स्पर्धा (इतर भाषा) : प्रथम क्रमांक – गोगटे-जोगळेकर कॉलेज
एकांकिका (मराठी )- प्रथम क्रमांक -फिनोलेक्स अकॅडमी (रत्नागिरी), उत्तेजनार्थ – कीर लॉ कॉलेज.एकांकिका (इतर भाषा )- प्रथम क्रमांक – गोगटे-जोगळेकर कॉलेज.स्किट (मराठी) : प्रथम क्रमांक – गोगटे-जोगळेकर कॉलेज, द्वितीय क्रमांक – भारत शिक्षण मंडळाचे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज ,तृतीय क्रमांक -फिनोलेक्स अकॅडमी. स्किट (इतर भाषा) : प्रथम क्रमांक -कीर लॉ कॉलेज.मोनो अक्टिंग (मराठी) : प्रथम क्रमांक – गोगटे-जोगळेकर कॉलेज, द्वितीय क्रमांक – भारत शिक्षण मंडळाचे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज ,तृतीय क्रमांक –डी.जे.सामंत कॉलेज (पाली). मोनो अक्टिंग (इतर भाषा) : प्रथम क्रमांक- एस. पी. हेगशेट्ये कॉलेज ,द्वितीय क्रमांक – भारत शिक्षण मंडळाचे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज , तृतीय क्रमांक-गोगटे-जोगळेकर कॉलेज.नाटक (माईम) : प्रथम क्रमांक- एस. पी. हेगशेट्ये कॉलेज, द्वितीय क्रमांक –नवनिर्माण संगमेश्वर , तृतीय क्रमांक-गोगटे-जोगळेकर कॉलेज.
ऑन दी स्पॉट पेंटिंग :प्रथम क्रमांक – देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाइनिंग, द्वितीय क्रमांक – फिनोलेक्स अकॅडमी, उत्तेजनार्थ -कीर लॉ कॉलेज .फाईन आर्ट -पोस्टर मेकिंग : प्रथम क्रमांक – राजेंद्र माने इंजीनियरिंग कॉलेज, उत्तेजनार्थ -कीर लॉ कॉलेज,फाईन आर्ट – मातीकाम : उत्तेजनार्थ -राजेंद्र माने इंजीनियरिंग कॉलेज,फाईन आर्ट – व्यंगचित्र : प्रथम क्रमांक -देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझायनिंग, उत्तेजनार्थ – राजेंद्र माने इंजिनियरिंग कॉलेज. फाईन आर्ट – रांगोळी : प्रथम क्रमांक – कीर लॉ कॉलेज ,द्वितीय -देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझायनिंग,उत्तेजनार्थ -लांजा कॉलेज.फाईन आर्ट – मेहंदी डिझाईन : प्रथम क्रमांक -लांजा कॉलेज, द्वितीय क्रमांक -आठल्ये-सप्रे-पित्रे कॉलेज आणि, एस. पी. हेगशेट्ये कॉलेज ,तृतीय –मोहिनी मुरारी चाफे कॉलेज आणि देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझायनिंग, उत्तेजनार्थ – फिनोलेक्स अकॅडमी.
प्राथमिक फेरीचा बक्षीस वितरण समारंभ मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक नीलेश सावे, भारत शिक्षण मंडळ संस्थेच्या कार्याध्यक्षा नमिता कीर, भारत शिक्षण मंडळ संस्थेचे कार्यवाह सुनील वणजू , भारत शिक्षण मंडळ संस्था सदस्य विनायक हाथखंबकर रत्नागिरी जिल्हा समन्वयक डॉ. आनंद आंबेकर, सह समन्वयक प्रा. ताराचंद ढोबळे , एस. पी. हेगशेट्ये कॉलेजचे प्राचार्य डॉ .एस .एन .गवाळे , लोकनेते श्यामराव कॉलेजचे प्राचार्य प्रमोद वारीक,भारत शिक्षण मंडळाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील,उप प्राचार्या वसुंधरा जाधव , सांस्कृतिक विभाग प्रमुख सहा .प्रा.ऋतुजा भोवड यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या फेरीतील विजेत्यांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली असून युवा महोत्सवाची अंतिम फेरी ०८ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत मुंबई विद्यापीठात होणार आहे.
सर्व यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले. या सर्व स्पर्धा शिस्तबद्ध व उत्साहात पार पडल्या.




