
पालकमंत्री नितेश राणे यांच्या आक्रमक होत मटका अड्ड्यावर घातली धाड, सिंधुदुर्ग पोलिस यंत्रणेच्या निष्क्रीयतेची लक्तरे वेशीवर

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील महायुती सरकारचे हे सुशासन आहे. आमच्या राज्यात अवैध धंद्यांना अभय नाही असे खडे बोल सूनावतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा अवैध अनैतिक धंदे बंद व्हायला पाहिजेत असे सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांनी पोलीस यंत्रणेला याआधीच निर्देश दिले होते.पालकमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर काही महिने बंद असलेला मटका जुगार अलीकडेच तेजीत सुरू झाला होता. अखेर पालकमंत्री नितेश राणे यांनीच स्वतः जातिनिशी कणकवली शहरातील अंधारी चाळी समोरील कणकवली तालुक्याच्या मटक्याच्या मुख्य अड्ड्यावर धाड टाकली. पालकमंत्री नितेश राणे यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सिंधुदुर्ग पोलिस यंत्रणेच्या निष्क्रीयतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.






