
चिपळूण-कराड मार्गावरील वाहतूक सुरू
” गेले दोन दिवस मुसळधार पावसामुळे बंद असलेली चिपळूण-कराड मार्गावरील वाहतूक अखेर आज (गुरुवार) पासून सुरू करण्यात आली आहे. हेळवाक येथे पाणी साचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. पाणी ओसरल्यानंतर सकाळपासून मार्ग सुरळीत करण्यात आला असून सकाळी ११ वाजल्यापासून चिपळूणमधून गाड्या सुटू लागल्या आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी दिली.




