
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी दिलासा दिला,चिपळूण–पनवेल मार्गावर ३ दिवस मेमू ट्रेन; २० स्थानकांवर थांबे
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी व भाविकांचा ओढा असतो. रेल्वे तिकिटांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी दिलासा दिला आहे. यंदा चिपळूण–पनवेल–चिपळूण मार्गावर अनारक्षित मेमू विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्या ५, ६ व ७ सप्टेंबर २०२५ रोजी धावणार आहेत.
या स्थानकांवर थांबे
अंजनी, खेड, कलांबणी, बु.दिवाणखवटी, विहीरे, करणजडी, सापे, वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जीते, आपटा व सोमटणे या २० स्थानकांवर गाड्या थांबतील.
वेळापत्रक
गाडी क्र. ०११६० – चिपळूण–पनवेल मेमू विशेष
सकाळी ११.०५ वाजता चिपळूण येथून सुटेल व संध्याकाळी ४.१० वाजता पनवेल येथे पोहोचेल.
गाडी क्र. ०११५९ – पनवेल–चिपळूण मेमू विशेष
संध्याकाळी ४.४० वाजता पनवेल येथून सुटेल व रात्री ९.५५ वाजता चिपळूण येथे पोहोचेल.
२९६ गणपती विशेष रेल्वे
याशिवाय मध्य रेल्वेतर्फे एकूण २९६ गणपती विशेष रेल्वे चालवल्या जात आहेत. गणेशोत्सव काळातील गर्दी लक्षात घेऊन ४४ अतिरिक्त गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) – सावंतवाडी रोड दरम्यान आठ द्विसाप्ताहिक सेवा धावतील. एलटीटी–सावंतवाडी विशेष (०११३१) सकाळी ८.४५ वाजता सुटून त्याच दिवशी रात्री १०.२० ला सावंतवाडीत पोहोचेल. तर परतीची ०११३२ सावंतवाडी–एलटीटी सेवा रात्री ११.२० ला सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता मुंबईत दाखल होईल.
या गाड्या ठाणे, पनवेल, रोहा, रत्नागिरी, कणकवली व सिंधुदुर्गसह कोकणातील प्रमुख स्थानकांवर थांबणार आहेत.
.




