राजापुरात दोन लाखांचा पानमसाला जप्त

महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक आरोग्य आणि हिताच्या दृष्टीने प्रतिबंधित केलेला १,८८,२१६ रुपये किमतीचा पानमसाला व सुगंधी तंबाखू नाटे येथील पोलिसांनी जप्त केला आहे. १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास मिठगवाणे-पारवाडी रोडवर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी आरोपी रवींद्र महादेव शिंदे (वय २७, रा. कोतापूर मेडवई, ता. राजापूर) याला अटक करण्यात आली आहे.

सागरी पोलीस ठाणे नाटे येथील पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय शिवाजी पाटील (पोकॉ/४१०) यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मिठगवाणे-पारवाडी रोडवर सापळा रचून (एम.एच.०८-एएन/०७६१) क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या मारुती ओमनी गाडीची तपासणी केली. यावेळी आरोपी रवींद्र शिंदेने अवैधरित्या आणि बेकायदेशीरपणे हा प्रतिबंधित माल आपल्या ताब्यात ठेवल्याचे दिसून आले.

पोलिसांनी जप्त केलेल्या मालामध्ये १,७०,००० रुपये किमतीची ओमनी गाडी आणि १८,२१६ रुपये किमतीचा केसरयुक्त विमल पानमसाला व तंबाखूचा साठा यांचा समावेश आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button