मध्य मंडल भाजपा रत्नागिरी (द) आणि महिला मोर्चा मध्य मंडल यांच्यातर्फे नाचणे आणि मिरजोळे जि.प गट आयोजित मंगळागौर आणि खेळ पैठणीचा स्पर्धेचे आयोजन

महिलांच्या पारंपरिक उत्सवाला नवा आयाम देत सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतुने भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण साहेब तसेच मत्स्य आणि बंदरविकास मंत्री तथा रत्नागिरी जिल्हा संपर्क मंत्री ना. नितेशजी राणे साहेब यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिण मधील मध्य मंडल आणि महिला मोर्चा मध्य मंडल आयोजित नाचणे आणि मिरजोळे जि.प गटामधील महिलांसाठी मंगळागौर आणि खेळ पैठणीचा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा रविवार दिनांक २४ ऑगस्ट २५ रोजी टी आर पी येथील अंबर हाॅल येथे सकाळी ११ ते ५ या वेळेमध्ये होणार आहे. या मंगळागौर स्पर्धेमधे प्रथम येणार्या संघास ₹. ११०००/- आणि सन्मानचिन्ह, दुसर्या क्रमांसाठी ₹.७०००/- आणि सन्मानचिन्ह, तिसर्या क्रमांकासाठी ₹. ५०००/- आणि सन्मानचिन्ह दिले जाणार असून, दोन संघाला ऊत्तेजनार्थ ₹.२५००/- आणि प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे.खेळ पैठणीचा यासाठी प्रथम क्रमांकाला ₹.५०००/- ची पैठणी , दुसर्या क्रमांकाला ₹. २५००/- ची सेमी पैठणी दिली जाणार आहे. ऊपस्थीत पहिल्या ३०० महिलांना आकर्षक भेटवस्तु दिली जाणार आहे.
सदर स्पर्धा यशस्वी करण्याकरीता जिल्हाध्यक्ष मा.राजेश सावंत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.वर्षाताई ढेकणे, प्रदाश महिला मोर्चा सचिव सौ.शिल्पा मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य मंडल तालुकाध्यक्ष श्री.प्रतिक देसाई, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सौ. प्रियल जोशी आणि सर्व महिला पदाधिकारी तसेच दोन्ही जि.प गटामधील कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. सदर स्पर्धेसाठी
सौ. दिप्ती फडके – ९४०४७६३७६२
सौ. अनुश्री आपटे – ८५३०९५७५५५
सौ. सुचिता नाचणकर – ९११२९०९९९९
सौ.अनुष्का शेलार – ७४४७८३३७०२
सौ. नेत्रा करंदीकर- ९८३४६४०९१७
सौ. शिवानी रेमुळकर – ९१३००९५२८०
सौ. धनश्री सावंतदेसाई – ७०५७९६३९६४
सौ आस्था गराटे – ७८८७३३०२२७
यांचेही संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button