
मुंबई गोवा महामार्गावरीलकळमजे पुलावरील वाहतूक पूर्ववत
*मुंबई – गोवा महामार्गावरील माणगाव नजीक येथील कळमजे पूल वाहतुकीसाठी पूर्वत करण्यात आला आहे
काल दिनांक १९ ऑगस्ट रोजी दुपारी बारानंतर सदर पूल खबरदारीचा उपाय म्हणून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
अतिवृष्टीमुळे या पुलावरून पाणी वाहत होते. त्याचप्रमाणे काही ठिकाणी तडे गेल्याचे लक्षात आल्यामुळे; खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली होती.
मात्र आज पावसाचा जोर कमी झाला असून प्रशासनाने पाहणी केल्यानंतर या पुलावरील सर्व वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.




