
नेत्रावतीचे एक्स्प्रेसचे राजापुरात जल्लोषात स्वागत
राजापूर येथील रेल्वे स्थानकात १५ ऑगस्टपासून नेत्रावती एक्स्प्रेसला थांबा देण्यात आला. या एक्स्प्रेसचे राजापूर रोड स्थानकात आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले. या स्वागत कार्यक्रमाला पंचक्रोशीतील ग्रामस्थ, रिक्षा संघटनांचे पदाधिकारी तसेच प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबईकडे जाणार्या अनेक प्रवाशांनी या एक्स्प्रेसमधून प्रवास केला. नेत्रावतीच्या मोटरमनचा शुक्रवारी रात्री कोंकण रेल्वे संघटना राजापूर शाखेचे अध्यक्ष विहार सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुंबईकडे जात असलेल्या नेत्रावतीचे स्वागत पंचक्रोशी ग्रामविकास समिती व राजापूर रोड रिक्षा संघटनेच्यावतीने करण्यात आले.
शुक्रवारी रात्री झालेल्या कार्यक्रमाला शिवसेना नेत्या अपूर्वा सामंत, विभाग प्रमुख संतोष हातणकर, अनंत सावंत, राजेद्र बाईत, सुधीर विचारे, अशफाक मापारी, विलास कपाळे, प्रकाश आरावकर, मनोहर आडिवरेकर, आंगले सरपंच श्रीधर सौंदळकर, संतोष सरवणकर, विहार सावंत, रेल्वे स्टेशन मास्टर राहुल सावंत आदी उपस्थित होते. शनिवारी सकाळी करण्यात आलेल्या स्वागत समारंभाला राजापूर रोड रेल्वे रिक्षा संघटनेचे अध्यक्ष नितीन शिंदे, संजय लाड, अनिल गुरव, बाबू कोरेगावकर, रमेश सौदळकर, सुनील पोटले, विकास पोटले, विलास कपाळे, सुभाष पिटळेकर, प्रदीप पुजारी, किशोर तांबे, बबन तांबे, इम्तियाज नाईक, प्रविण नकाशे, कैलास मगदूम यांच्यासह अनेक स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.www.konkantoday.com




