
मुंबईत गोविंदाचा मृत्यू, तोल गेला अन् खाली कोसळला; सणाला गालबोट
मुंबईच्या मानखूर्दमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दहीहंडी उत्सवादरम्यान, एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे. दहीहंडीसाठी दोरी बांधताना बाल गोविंदा पथकातील गोविंदाचा तोल गेला आणि खाली पडला. उंचावरून पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. जगमोहन शिवकिरण चौधरी (वय वर्ष ३२) असे मृत गोविंदाचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.




