महामार्ग गुणवत्तेसाठी चौकशी समिती स्थापन करा, जिल्हा अग्रीमा महिला संघाची मागणी


मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या तसेच निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्या निदर्शनास आणून देण्यासाठी जिल्हा अग्रीमा महिला संघाच्या प्रतिनिधींनी गेल्या आठवड्यात दिल्ली येथे केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी या प्रतिनिधींनी सादर केलेली महामार्गाच्या दयनीय अवस्थेची सत्यता दर्शवणारी कागदपत्रे, फोटो व चित्रफिती आदी पुरावे न स्वीकारता मंत्री गडकरी यांनी महामार्गचे तांत्रिक सल्लागार टेंग-नागपूर व मुख्य अभियंता संतोष शेलार यांच्याकडे पाठपुराव्यासाठी संपर्क साधण्याचा सल्ला दिला.
यावेळी अग्रीमा संघाच्या निमंत्रक शामल कदम, अध्यक्षा स्वाती साळवी, कार्याध्यक्षा मुस्कान अडरेकर व सचिव मानसी भोसले यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याशी चर्चा केली. महामार्ग अधिकच रखंडत चालल्याने प्रवाशांना, परिसरातील गावकर्‍यांना, परिसरातील व्यावसायिकांना होत असलेला त्रास तसेच निकृष्ट बांधकामामळे कायमचा असुरक्षित झालेला महामार्ग ही गंभीर चिंतेची बाब असून त्यावर सत्वर कृती करावी आणि या महामार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण केले जावे, अशी मागणी केली, भोस्ते घाटात तीव्र उतार व वळणे असल्याने जड वाहने अनेकदा नियंत्रण गमावत जीवघेणे अपघात होतात. त्यामुळे येथे तांत्रिकदृष्ट्या सक्षम वेग नियंत्रण प्रणालीची तातडीने व्यवस्था करावी, परशुराम येथे शाळेच्या बसेस शाळेकडे वळतात, त्या जंक्शनवर एक वाहतूक चौक प्रस्तावित आहे. या मार्गावर मोठ्या कंटेनर व ट्रकसह जड वाहनांची संख्या जास्त असते. घाटाच्या नैसर्गिक चढ-उतारामुळे बाहने वेगाने खाली येतात.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button