आंबा घाटात दोन गवारेड्यांचा झुंजी दरम्यान कड्यावरून पडून मृत्यू*

दि १४ ऑगस्ट

आंबा घाटातील कळकदरा या ठिकाणी आज सकाळी नऊ वाजता च्या सुमारास दोन गवारेड्यांचा झुंजी दरम्यान कड्यावरून पडून मृत्यू झाला आहे.
रत्नागिरी साखरपा कोल्हापूर कडे जाणाऱ्या (कळकदरा) महामार्गावर हायवेच्या उजव्या बाजूला दोन गवा रेडे झुंजी दरम्यान कड्यावरून पडून मृत झाले असले बाबतची बातमी वनरक्षक वन उपज तपासणी नाका साखरपा यांनी वनपाल संगमेश्वर यांना दिली.
मिळालेली माहिती वरिष्ठांना देऊन सर्व स्टाफसह साहित्यासह जागेवर जाऊन खात्री करता सदर ठिकाणी दोन गवा रेडे मृत अवस्थेत पडले असल्याचे आढळून आले.
पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक दाभोळे यांना बोलावून त्यांच्याकडून शवविच्छेदन करून घेतले. शवविच्छेदनात सदर गवारेडे यांचा मृत्यू हा झुंजीदरम्यान पडून झालेला असले बाबत पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. शवविच्छेदन झाल्यानंतर सदर मृत दोन गवारेडे यांचे शरीर सर्व अवयवांसहित घटना घडलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर सुरक्षित ठिकाणी आणून जाळून नष्ट करण्यात आले.
सदर वेळी घटनास्थळी परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी श्री प्रकाश सुतार, परिमंडळ वन अधिकारी संगमेश्वर देवरुख श्री न्हानू गावडे ,वनरक्षक साखरपा श्री सहयोग कराडे, वनरक्षक फुणगुस श्री आकाश कडूकर ,वनरक्षक दाभोळे श्रीमती सुप्रिया काळे, वनरक्षक आरवली श्री सुरज तेली , वनरक्षक वन उपज तपासणी नाका साखरपा, श्री रनजीत पाटील ,श्री महादेव जलने ,श्रीमती मिताली कुबल, प्राणी मित्र श्री महेश धोत्रे, श्री दिलीप गुरव हे उपस्थित होते. सदरची कार्यवाही माननीय विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरीजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी चिपळूण श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421 741335 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाने केलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button