
चाकरमान्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी महामार्गावर सुरक्षा चौक्या व अन्य सुविधा -जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे
गणेशोत्सव अवघ्या १५ दिवसांवर आल्याने जिल्ह्यात सुरक्षा व शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी गणेशोत्सवादरम्यान गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी महामार्गावर सुरक्षा चौक्या उभारल्या जाणार असल्याची माहिती दिली. यासोबतच, गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्यासाठी आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकार्यांची एक संयुक्त बैठक आयोजित केली जाणार आहे.
पोलीस प्रशासनाकडून नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात जात आहेत. गणेशोत्सवादरम्यान जिल्हयात महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे बगाटे यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढते. चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी महामार्गावर सुरक्षा चौक्या उभारल्या जातील. या चौक्यांमधून प्रवाशांना आवश्यक ते सहकार्य पुरवले जाईल, असे सांगितले. बगाटे यांनी सांगितले की, करण्यासाठी रत्नागिरीत पोलीस पाटील व सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकार्यांची बैठक घेतली जाणार आहे.
www.konkantoday.com