
बहादूरशेख नाका परिसरात गटाराचा उतार चुकीच्या दिशेने, ग्रामस्थांना बसतोय फटका
बहादूरशेख नाका परिसरातील मुंबई-गोवा महामार्गावर बांधण्यात आलेल्या गटाराचा उतार चुकीच्या दिशेने काढल्याने पावसाळ्यात संपूर्ण परिसर पाण्याखाली जाण्याची वेळ येते. वाशिष्टी नदीकडे जोडणारा मार्ग बंद करून गटारातील पाणी थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व वस्तीकडे वळवण्यात आले आहे. यामुळे व्यापारी वर्ग आणि नागरिक त्रस्त झाले आहेत.
राष्ट्रीय महामार्गी प्राधिकरणाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. वाशिष्टी नदीपर्यंत गेलेले गटार जिथे पाणी बाहेर पडायला हवे होते, ते ठिकाण सध्या बंद अवस्थेत आहे.www.konkantoday.com




