
कै. प्र. ल. मयेकर कथालेखन स्पर्धेचा बक्षीस समारंभ १५ ऑगस्ट रोजी
रत्नागिरी : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा रत्नागिरी आणि उदय सामंत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कै. प्र. ल. मयेकर कथालेखन स्पर्धेचा बक्षीस समारंभ शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता हॉटेल विवेक येथील सेमिनार हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
याचवेळी कथालेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत भूषविणार असून प्रकाश देशपांडे आणि राजीव लिमये यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमाला सर्व साहित्यिक आणि साहित्यप्रेमी नागरीकांनी अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे रत्नागिरी शाखेच्या अध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे यांनी केले आहे.




