उत्साह आणि निखळ आनंदाने भरलेला स्त्रीत्वाचा उत्सव…

उदय सामंत प्रतिष्ठान आयोजित श्रावण स्मार्ट सखी २०२५
प्राथमिक फेरीत निवड झालेल्या २१ सखी रविवार दिनांक १० ऑगस्टच्या अंतिम स्पर्धेकरिता सज्ज होत्या. केवळ दोन दिवसांच्या कालावधीत त्यांनी वेशभूषा, स्टेजवरील वावर, संवाद कौशल्य यावर मेहनत घेतली. प्रतिष्ठानच्या वतीने या तयारीकरिता काही सेशन्सचं आयोजन आमच्या या सख्यांसाठी करण्यात आलं. खूप मेहनत घेऊन तयार झालेल्या या २१ सख्या अंतिम फेरीत वावरताना त्यांच्यातला आत्मविश्वास वाखाणण्यासारखा होता.


पहिल्या फेरीत महाराष्ट्राची शान असलेल्या मराठमोळ्या वेशभूषेतल्या या सख्या पाश्चात्य ठेक्यावरही तितक्याच सहजतेने स्टेजवर वावरल्या. खरंतर यांच्यापैकी कुणीच प्रोफेशनली ट्रेंन नव्हत्या, पण त्यांच्यातला उत्साह आणि आत्मविश्वास त्यांना एका उंचीवर घेऊन गेला.


यानंतरची दुसरी फेरी कौशल्य फेरी त्यांच्यातल्या कलागुणांना वाव देणारी होती. कोणी नृत्य सादर केलं, कोणी गीत सादर केलं, कोणी अभिनय सादर केला तर कोणी योगाचं प्रात्यक्षिक करून दाखवलं. आपल्यातली कला सादर करताना त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान खूप काही सांगून गेलं.
तिसऱ्या फेरीमध्ये परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना आमच्या सख्या जराही गडबडल्या नाहीत. खरंतर ही परीक्षा परिक्षकांचीच होती असाच म्हणायला हवं.
यानंतर उपस्थित सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहचली होती. स्मार्ट श्रावणसखी 2025 विजेती कोण होणार ? याबद्दल सगळ्यांनाच कुतूहल होतं.


आणि निकाल जाहीर झाला…..
स्मार्ट श्रावणसखी 2025 विजेती ठरली सौ. दिशा भाटकर ,
पहिली उपविजेती सौ. अनघा नाचणकर आणि
दुसरी उपविजेती होण्याचा मान सौ. विजेता मोर्ये यांना मिळाला.
या खेरीज विशेष परितोषिक म्हणून
1.उत्तम व्यक्तिमत्व सौ. दीपिका कुबल , 2. उत्कृष्ट पेहराव सौ. सौम्या घुडे 3. मोहक हास्य सौ.योगिता खांडेकर 4.उत्तम ज्येष्ठ व्यक्तिमत्व सौ. कुमुदिनी शेट्ये यांनी पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणाऱ्या भेट वस्तूसह अमेय ज्वेलर्स कडून एक नेकलेस जी.के. कॉस्मेटिक्स कडून एक गिफ्ट हॅम्पर देण्यात आले. तसेच
स्थानिक महिला व्यापारी वर्गाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असलेले सहकार बोर्ड चे अध्यक्ष,रत्नागिरी व्यापारी संघटनेचे मार्गदर्शक श्री. हेमंत वणजू हे यंदा सप्टेंबर महिन्यामध्ये दिवाळी शॉपिंग फेस्ट २०२५ आयोजित करत असून त्याच्या उद्घाटनाचा मान हा स्मार्ट सखी मधील विजेत्या पहिल्या 3 महिलाना देण्यात येणार असल्याचे त्यांनी घोषित करून त्यांचा सन्मान केला.
या स्पर्धेच्या यशात आवर्जून नावं घ्यावी लागतील अशी काही मंडळी आहेत.
या संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनात अत्यंत महत्त्वाचा भाग पार पाडणारा दिलसे क्रिएशनचा सिद्धेश बंदरकर, दीपक पवार ,प्रथमेश साळवी, अभिजीत दुडे सर्व स्पर्धकांना मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या ॲड. निलोफर खान, ध्वनी व्यवस्था पाहणारे पानवलचे डावा साउंड म्हणून प्रसिद्ध असलेले होरंबे, हे आनंदाचे क्षण कायमचे टिकून राहावेत यासाठी या संपूर्ण स्पर्धेचे व्हिडिओ शूटिंग करणारे रत्नागिरीतील प्रथितयश फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर कांचन मालगुंडकर, सातत्याने साफसफाईकडे अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून असणारा नाट्यगृहाचा संपूर्ण स्टाफ,
याच बरोबर अत्यंत महत्वाची आणि जबाबदारीची भूमिका पार पाडलेल्या शिवसेनेच्या शहर महिला आघाडीच्या प्रमुख सौ. स्मितल पावसकर ,जिल्हा प्रमुख सौ. शिल्पा सुर्वे,सौ. पूजा पवार,सौ. श्रद्धा हळदणकर,सौ. कौसल्या शेट्ये,सौ. वैभवी खेडेकर,सौ. दिशा साळवी,सौ. ऋतुजा देसाई,सौ. प्रिया साळवी,सौ.सुहासिनीभोळे,सौ.रूपाली नागवेकर सौ.अनिशा डोंगरे या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
*या कार्यक्रमात व्यवस्थापनामध्ये अत्यंत महत्वाचे काम युवतींकडून करण्यात आले यामध्ये दिक्षा मांडवकर, रिया मांडवकर, श्रावणी राऊत, सानिया दळवी, वेदिका चव्हाण, उत्कर्षा नाचणकर, वैष्णवी खंडारे, सेजल किर, शिवानी पवार, सेजल शिंदे, मनस्वी नागवेकर यांनी केले.

तसेच या स्पर्धेचं परीक्षण करणाऱ्या ॲड. समृद्धी सुदेश मयेकर आणि डॉ. अनुराधा लेले मॅडम, उत्कृष्ट सूत्रसंचालनाने ज्यांनी कार्यक्रम खुलवला त्या सौ. पूर्वा पेठे या सर्वांची नावं आवर्जून नमूद करणे आवश्यक आहे. अर्थातच ज्यांच्या सहभागामुळे ही स्पर्धा इतकी चुरशीची झाली अशा आपल्या सर्व सहभागी स्मार्ट सखी…..
ज्यांच्या संकल्पनेतून नेहमीच असे नवनवीन उपक्रम रत्नागिरीकरांच्या भेटीला येतात असे आपल्या सर्वांचे लाडके मा.ना. डॉ. उदय सामंत साहेब यांचे विशेष आभार.*
पुढच्या वर्षी पुन्हा भेटू आणखी जास्त उत्साहासह….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button