
कबुतरखान्यांवर बंदी कायम, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
कबुतरांना खाऊ घालण्याच्या मुंबईतील ‘कबुतरखाना’ प्रकरणात सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना दादर आणि इतर ठिकाणी बेकायदेशीरपणे आणि नियम तोडून खाऊ घालणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते, या आदेशाविरुद्ध दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली.सुप्रीम कोर्टाने मुंबई हाय कोर्टाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कबुतरखाने बंद ठेवण्याचा निर्णय कायम राहणार आहे.
दरम्यान, मुंबईतील दादर येथील कबुतरखाना आणि इतर ठिकाणी कबुतरांना खाऊ घालण्यामुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होत असल्याच्या तक्रारीनंतर मुंबई सुप्रीम कोर्टाने बृहन्मुंबई महानगरपालिकेला (BMC) दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाच्या विरोधात काही याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.