जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेत एस.आर.के.ची 33 पदकांची कमाई

क्यूरोगी प्रकारात एस. आर. के. तृतीय क्रमांकावर

रत्नागिरी:

रत्नागिरी: चिपळूण येथे आयोजित जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेत एस. आर. के. क्लबने 14 सुवर्ण, 12 रौप्य, 09 कास्य पदकाची कमाई करत क्यूरोगी मध्ये तृतीय क्रमांक पटकावला आहे.
रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या मान्यतेने व शहानुर तायक्वांदो अकॅडमी चिपळूण यांनी आयोजित केलेली जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धा 2 ते 4 ऑगस्ट या कालावधीत स्वामी मंगल हॉल बहादुर शेख नाका चिपळूण येथे आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत एस. आर. के. तायक्वांदो क्लबचे खेळाडू सहभागी झाले होते.
या स्पर्धेत अर्जुन पवार, स्वरा साखळकर, यज्ञा चव्हाण, तुषार कोलेकर, मृदुला पाटील, वेदांत चव्हाण, श्रुती चव्हाण, अमेय सावंत, अद्वैत मिश्रा, ओम देसाई, तुळजा हर्षे, देवन सुपल, पार्थ गावडे या खेळाडूंनी सुवर्ण पदकांची कमाई केली.
गुरमीत चव्हाण, पार्थ गुरव सार्थक चव्हाण समर्था बने, ओम अपराज, सुजल सोळंके, श्रीजय भागवत, श्लोक पाटील, गार्गी घडशी, वेदिका पवार, प्राजक्ता काटकर हे रौप्य पदक विजेते खेळाडू ठरले आहेत.
स्पर्धेत सुर्यांश हातिसकर, राजवीर पाटील, प्रांजल लांजेकर, आयुष चव्हाण, मृण्मयी वायंगणकर, रोमा तापेकर, स्वर्णिका रसाळ वेदिका भोसले रूद्रा पावसकर यांनी कांस्यपदक प्राप्त केले. तसेच स्वरा साखळकर फ्रीस्टाइल पुमसे सुवर्णपदक, इंडिव्युजल पुमसे सिल्वर मेडल व कॅडेट गर्ल्स बेस्ट फायटरची मानकरी ठरली आहे.
याशिवाय ओजस भोसले,चैतन्य धुपकर,तिर्था लिंगायत,अद्वैत मिश्रा, शौनक भोपळे,ओम देसाई, खुशाल दहीया, चैतन्य देशमुख,दिया रणसे, खुशाली दहीया,आराध्या सावंत,आरोही जौंजाळ ,यश भागवत, रावी वारंग, रोहित कुंडकर,हर्ष रसाळ, आराध्य सावंत, आयुष कोळेकर,श्रेयसी हत्तिस्कर या खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

स्पर्धेत यशस्वी झालेल्या या खेळाडूंच तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार व्यंकटेशराव कररा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, तायक्वांदो प्रशिक्षक प्रशांत मकवाना, क्लबचे अध्यक्ष अमोल सावंत, उपाध्यक्ष वीरेश मयेकर, सचिव शीतल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत, सदस्य वीरेश मयेकर, निखिल सावंत, प्रफुल्ल हतिसकर आणि समस्त पालक वर्ग यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या स्पर्धेसाठी क्लबच्या साहिल आंबेरकर यांनी पंच म्हणून काम पाहिले. संघ प्रशिक्षक म्हणून शाहरुख शेख आणि मिलिंद भागवत यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button