*सामाजिक कार्य करण्यासाठी युवकांमध्ये आवड निर्माण व्हावी,समाजातील गोरगरीब तसेच अडीअडचणीत सापडलेल्या गरजू लोकांना सहकार्याची भावना युवकांमध्ये निर्माण करण्यासाठी संस्थेच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घ्यायचे ठरविले आहे.या उपक्रमात पहील्या टप्प्यात रत्नागिरी शहरातील महाविद्यालयातील सुमारे 25 विद्यार्थ्यांना सहभागी करण्याचे ठरले आहे,हा उपक्रम 18 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे,यांची सुरवात संस्थेच्या रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील असलेल्या आपल्या रुग्ण मदत केंद्र येथून होईल.या उपक्रमात सिव्हिल हॉस्पिटलच्या सर्व विभागांची माहिती दिली जाईल, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस केली जाईल, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार पध्दती कशा आहेत शिवाय संस्थेच्या रुग्ण मदत केंद्र येथून रुग्णांना कशा प्रकारे मदत केली जाते याची माहिती दिली जाणार आहे,हा उपक्रम सलग 8 दिवस राहणार आहे,तरी या उपक्रमात आपण सर्व सहभागी व्हावे ही विनंती