
रत्नागिरी जवळील हातखंबा तिठा येथील सिद्धगिरी मंगल कार्यालयाजवळ उभा असलेला ८ लाखांचा डंपर चोरीला
रत्नागिरी जवळील हातखंबा तिठा येथील सिद्धगिरी मंगल कार्यालयाजवळ उभा असलेला तब्बल ८ लाख रुपये किंमतीचा डंपर अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहाफिज रियाज अहमद टंकसाळी (वय ३०, रा. जळगाव, कर्नाटक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, डंपर क्रमांक केए २२ सी ४०८९ हा हातखंबा तिठा सिद्धगिरी मंगल कार्यालयाजवळ एमएमटी लॉजिस्टिक कंपनी येथे उभा करून ठेवला होता. तो चॉकलेटी रंगाचा असून मागील भाग पिवळ्या रंगाचा आहे. जुन्या बाजारभावानुसार या डंपरची किंमत ८ लाख १० हजार रुपये आहे.
स्वतःच्या फायद्यासाठी अज्ञात चोरट्याने हा डंपर चोरून नेल्याची तक्रार करण्यात आली आहे




