
शिरळ गावात घरकामासाठी ठेवलेल्या कामगाराला मारहाण
शिरळ गावात घरकामासाठी ठेवलेल्या कामगाराला मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामदास चंद्रकांत चव्हाण (वय ५२), संगीता रामदास चव्हाण (वय ४४), विशाल रामदास चव्हाण (वय २३), आणि सागर रामदास चव्हाण (वय २०, सर्व रा. शिरळ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
या चौघांनी मुंजा किशनराव भिंगारे (वय ३८, रा. आर्वी, जिल्हा परभणी) या व्यक्तीस गेल्या वर्षभरापासून घरकामासाठी ठेवले होते. दरम्यान, त्याच्यावर वारंवार शारीरिक आणि मानसिक अत्याचार होत असल्याची तक्रार अनिल भिंगारे यांनी पोलिसांकडे दाखल केली आहे.