
21 ढोल आणि गाढव घेऊन सार्व. बांधकाम कार्यालयासमोर सलामी देऊन निषेध करू, ठाकरे सेनेचा सावंतवाडीत इशारा
सावंतवाडी येथील ब्रिटीशकालीन उपजिल्हा कारागृहाची भिंत पडण्यास जबाबदार ठेकेदार व अभियंत्यावर पंधरा दिवसांत कारवाई करावी, अन्यथा 21 ढोल आणि गाढव घेऊन सार्व. बांधकाम कार्यालयासमोर सलामी देऊन निषेध करू, असा इशारा शुक्रवारी ठाकरे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी व सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी दिला.यावेळी बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणा विरोधात ढोल- ताशे वाजवून निषेध करण्यात आला.
आ. दीपक केसरकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सावंतवाडी सार्व. बांधकाम विभागाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून हे ‘बँड बाजा’ बारात आंदोलन पुकारण्यात आले होते.