
,कलासाधना संस्थेच्या “तबला कार्यशाळेस” रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
स्व. उस्ताद झाकीर हुसेन यांच्या स्मरणार्थ नुकतेच रोजी शांताई बाय दी लेक रिसॉर्ट, पाटपन्हाळे येथे गुहागर तालुक्यातील साखरीआगर गावचे सुपुत्र संस्थापक श्री. सौरभ कमलाकर बिर्जे तबला विशारद, पुणे यांच्या कलासाधना या संस्थेच्या वतीने आयोजित तबला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते संगीतप्रेमी विद्यार्थी व पालकांचा या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यशाळेमध्ये चिपळूण येथील सुप्रसिद्ध तबलावादक,तबला विशारद श्री. प्रथमेश महेश देवधर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी तबल्याच्या मूलभूत तंत्रज्ञानासोबतच विविध ताल, बंदिशी, संगीतातील साथ संगत व सादरीकरणातील बारकाव्यांवर उपस्थितांना माहिती दिली. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि विविध प्रश्न विचारून आपले ज्ञान वाढवले.
यात “ऑटीझम” असलेल्या विद्यार्थ्यांना पण सहभागी करून घेण्यात आले होते.
या कार्यशाळेसाठी श्रीम.अस्मिता बिर्जे गोसावी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, तालुका माणगाव, जिल्हा रायगड व श्री. शशांक गोसावी, आयटी विशेषज्ञ, मुंबई यांची प्रमुख उपस्थिती होती
कोकणातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगीत विषयाबद्दल शास्त्रोक्त पद्धतीने शिक्षण उपलब्ध करून देण्याचे उत्तम काम आयोजक श्री. सौरभ कमलाकर बिर्जे यांच्या कलासाधना या संस्थेच्या माध्यमातून होत असल्याबद्दल मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. तसेच कार्यशाळेस उपस्थित पालकही आपल्या विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमासोबतच विविध कला जोपासून करिअरची नवीन संधी उपलब्ध करून देत असल्याबद्दल पालकांचेही कौतुक केले.
कार्यशाळेच्या शेवटी सहभागी सर्व विद्यार्थ्यांना तसेच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले कलासाधना संस्थेत विविध वाद्यांचे संगीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आदर्श तबलावादक विद्यार्थी तसेच गुणवंत विद्यार्थी पुरस्कार देऊन गुणगौरव करण्यात आला. विशेष बाब म्हणजे अशा विविध विषयांमध्ये प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचा गुणगौरव विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला.
अशा कार्यशाळांमुळे भारतीय शास्त्रीय संगीताची गोडी नव्या पिढीत निर्माण होण्यास मदत होत असल्याचे आयोजक श्री. सौरभ बिर्जे यांनी त्यावेळी बोलताना सांगितले.