
रत्नागिरी जिल्हा परिषदेने प्राथमिक शाळांना ८४ दिवसांची सुट्टया देवू केल्या, मात्र आदेश ७६ सुट्ट्यांचा
इयत्ता पहिली व दुसरीसाठी रविवार वगळून ७६ सुट्ट्या द्याव्यात, असे राज्य शैक्षणिक संशोधन व परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी २ जुलैला आदेश काढले असताना रत्नागिरी जिल्हा परिषदेने मात्र प्राथमिक शाळांना ८४ दिवस सुट्टी देऊ केली आहे.
शाळांमध्ये तासिका कशा असाव्यात, त्या किती वेळाच्या असाव्यात त्याचे वेळापत्रक कसे असावे, या सार्या बाबी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ठरवत असते. आठवड्यातील कामाचे दिवस त्याचबरोबर वार्षिक कार्य दिवस याविषयीही परिषद सूचना करत असते. त्याची अंमलबजावणी जिल्हा परिषद व मान्यताप्राप्त शिक्षण संस्था करत असतात.
२ जुलै रोजी परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे की, इयत्ता पहिली व दुसरीसाठी ७६ सुट्ट्या वर्षभरात देण्यात याव्यात. याशिवाय रविवारच्या ५२ सुट्टया लागू राहतील. असे असताना रत्नागिरी जि.प.ने ८४ दिवस पूर्ण वर्षात जि. प. शाळांना सुट्ट्या देऊ केल्या आहेत. परिषद व जिल्हा परिषद यांच्या आदेशात भिन्नता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा परिषदेनेही त्यावर कोणताही खुलासा दिलेला नाही. या संदर्भात जि.प.च्या जबाबदार व्यक्तींशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळू शकला नाही.www.konkantoday.com




