
राजापूर तालुक्यातील दोनिवडेतील बेपत्ता वृद्धाचा मृतदेह अर्जुना नदीत आढळला
राजापूर पोलीस ठाण्यात बेपत्ता म्हणून नोंद असलेल्या तालुक्यातील दोनिवडे गावातील सुरेश सदाशिव बेंद्रे (६५) यांचा मृतदेह बुधवारी सकाळी अर्जुना नदीपात्रात आढळून आला आहे. तशी माहिती राजापूर पोलिसांना दिली.
सुरेश बेंद्रे हे ४ ऑगस्ट रोजी सकाळी घराबाहेर पडले होते. ते परत घरी आले नसल्याने त्यांचा नातेवाईकांनी शोध घेतला असता ते आढळले नाहीत. दरम्यान त्यांच्या पायातील चप्पल दोनिवडे गावात नदीपात्रालगत दिसल्या होत्या. त्यानंतर त्यांचे बंधू जगन्नाथ बेंद्रे यांनी राजापूर पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी शोध सुरू. केला होता. त्यांच्या चप्पल नदीकिनार्यालगत आढळल्याने ते नदीपात्रात पडल्याची शंका होती. त्या दृष्टीनेही पोलिसांसह स्थानिकांकडून गेले २ दिवस शोध घेतला जात होता. अखेर बुधवारी सकाळी बेंद्रे यांचा मृतदेह अर्जुना नदीपात्रात शीळ परिसरात आढळला. यानंतर पंचनामा व शवविच्छेदन करून हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.www.konkantoday.com




