सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केली मुंबई गोवा महामार्गाची पाहणी


गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुकर आणि सुरक्षित व्हावा, या एकमेव ध्येयाने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी शनिवारी मुंबई-गोवा महामार्गाची झाडाझडती घेतली.पनवेलमधील पळस्पे येथून पाहणी दौऱ्याला सुरुवात करत, रखडलेल्या कामांवरून त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि कोणत्याही परिस्थितीत गणेशोत्सवापूर्वी महामार्ग वाहतुकीसाठी सुसज्ज करण्याच्या सक्त सूचना दिल्या.मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सकाळी पनवेलमधून दौऱ्याला सुरुवात केली. महामार्गाच्या विविध टप्प्यांवर प्रत्यक्ष थांबून त्यांनी कामांची गुणवत्ता आणि गती तपासली. अनेक ठिकाणी कामे संथ गतीने सुरू असल्याचे पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. स्थानिक अभियंते, ठेकेदार आणि संबंधित विभागीय अधिकाऱ्यांसोबत त्यांनी जागेवरच चर्चा करून कामाच्या वेळापत्रकाचा आढावा घेतला.

प्रवाशांचे हाल आणि सरकारचे लक्ष

मुंबई-गोवा महामार्गावर अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे सध्या वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. खड्डे, अर्धवट कामे आणि वाहतूक कोंडी यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात ही समस्या अधिक गंभीर होऊ नये, यासाठी सरकारने आता कंबर कसली आहे.

  • शिवेंद्रराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री”आजचा दौरा हा केवळ पाहणीसाठी नाही, तर कोकणात गणपतीसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना कोणतीही अडचण होऊ नये, यासाठीच्या तयारीचा भाग आहे. महाडमध्ये स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर आम्ही रत्नागिरीकडे रवाना होणार आहोत. सरकारचा कटाक्ष आहे की गणपतीपूर्वी महामार्गावरील कामे पूर्ण व्हावीत आणि यासाठी कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही.” मंत्री महोदयांच्या या दौऱ्यामुळे आणि त्यांनी दिलेल्या सक्त सूचनांमुळे आता कामाला वेग येण्याची अपेक्षा आहे. येणारे काही आठवडे हे ठेकेदार आणि प्रशासकीय यंत्रणांसाठी कसोटीचे ठरणार आहेत. जर दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण झाली, तर वर्षानुवर्षे त्रास सहन करणाऱ्या कोकणवासीयांना आणि गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळेल, हे निश्चित.गणेशभक्तांना दिलासा मिळणार?मुंबई-गोवा महामार्गावर १५ तास ठप्प वाहतूक अखेर प्रशासनाच्या अथक प्रयत्नांनंतर पूर्ववत
    युद्धपातळीवर काम: गणेशोत्सवाच्या काळात कोकणात लाखो भाविकांची वर्दळ असते. ही बाब लक्षात घेऊन महामार्गावरील कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जबाबदारीचे भान: संबंधित ठेकेदार, अधिकारी आणि यंत्रणांनी आता त्यांच्या जबाबदाऱ्या अधिक गांभीर्याने पार पाडाव्यात, अशी स्पष्ट ताकीद मंत्री भोसले यांनी दिली आहे.

सुरक्षेला प्राधान्य: कामाची गती वाढवताना प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button