
न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल आंबेड बूच्या मंत्रिमंडळाचा शालेय शपथविधी संगमेश्वर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न
⏯️ या वयात विद्यार्थ्यांना लोकशाहीचे धडे देणे कौतुकास्पद:- पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण
⏯️ विद्यार्थ्यांमध्ये सायबर क्राइम विषयी जनजागृती होणे गरजेचे
📍संगमेश्वर
📍 दि.०६ ऑगस्ट २०२५
संगमेश्वर तालुक्यातील नवनिर्मिती फाउंडेशन उक्षी संचलित न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल आंबेड बू. या शाळेमध्ये लोकशाहीचे धडे गिरवण्यासाठी स्टुडन्ट कौन्सिलची स्थापन करण्यात आले या स्टूडेंट कौन्सिल ची शपथविधी आज संगमेश्वर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण तसेच सामाजिक कार्यकर्ते युयुस्तु आरते यांच्या उपस्थितीत पार पडले. या वयात विद्यार्थ्यांना लोकशाहीचे धडे गिरवणे ही बाब कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस सुजाण नागरिक घडवण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी घडत जाणार असल्याचे प्रतिपादन यावेळेस संगमेश्वर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी केले. शालेय मंत्रिमंडळाचा हा शपथविधी संगमेश्वर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्ते युयुस्तु आरते यांच्या उपस्थितीत पार पडला.
विद्यार्थ्यांना लोकशाही नेमकी काय असते आणि आपलं मत किती महत्त्वाचं असतं आपण दिलेल्या मतांच्या आधारे आमदार, खासदार हे निवडून सरकार स्थापन होतं आणि सरकारच्या माध्यमातून हे राज्य चालवले जाते. त्याच पद्धतीने या राज्यामध्ये लोकशाही लागू आहे आणि त्या लोकशाहीचे धडे गिरवण्याचे काम नियोजन इंग्लिश मीडियम स्कूल आंबेड यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. ज्या पद्धतीने लोकशाहीच्या आधारावर निवडणुका घेतल्या जातात त्याच पद्धतीचा अवलंब करून या वयात विद्यार्थ्यांना लोकशाहीचे महत्त्व पटवून देण्यासाठी शालेय स्तरावर शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात येते या शाळेमध्ये या मंत्रिमंडळाची स्थापना करत असताना निवडणुकी पद्धतीने ही स्थापना करण्यात आली यावेळेस जी जी विद्यार्थी या निवडणुकीसाठी उभे होते त्याला इतर विद्यार्थ्यांनी मतदान देऊन निवडून आणले आणि त्यानंतर त्यांना त्यांचे खातेवाटप करून आज संघमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या उपस्थितीत शपथविधी ग्रहण संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजाराम चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समाजामध्ये वाढत असणारा सायबर क्राईम बद्दल ही विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी संस्थेने आणि शाळेने प्रयत्न करावा त्यासाठी पोलिसांची लागेल ती मदत करू असे आश्वासन यावेळेस त्यांनी दिले.
यावेळेस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना सामाजिक कार्यकर्ते युयुस्तु आरते यांनी विद्यार्थ्यांच्या कामाची माहिती घेत त्यांचे कौतुक केले त्याचप्रमाणे सुजाण नागरिक घडत असताना आपल्या आवडीनुसार पुढील शिक्षण घ्या कोणाच्या दबावाखाली शिक्षण न घेता तुमचं आयुष्य हे तुम्हाला जगायचे असून तुमचा मार्ग तुमच्या आवडीच्या शिक्षणाानुसार स्वीकारा असाही संदेश दिला.
या कार्यक्रमानिमित्त संस्थेचे अध्यक्ष रमजान गोलंदाज सचिव राजेश आंबेकर ज्येष्ठ संचालक सलाउद्दीन बोट, श्री. जोशी, विश्वास भोसले,
मुख्याध्यापिका नाझीमा बांगी, उपमुख्याध्यापिका सुजेन अलजी, शिक्षक कौस्तुभ धनावडे, ऋषभ खंदारे, आकलीमा परदेशी, समीक्षा फेपडे, आसिफा मालगुंडकर,विदिशा कांबळे, कुदसीया मोडक, अलीशा पाटणकर, नजराणा कापडे, मुसरत आंबेडकर, नाजीम आंबेडकर, अझरुद्दीन जांभारकर,तसेच सर्व विद्यार्थीवर्ग उपस्थित होते.