
किनार्यावरील छोट्या नौका अजूनही मच्छिमारी करण्याच्या प्रतिक्षेत
शासकीय मासेमारी बंदीचा कालावधी संपुष्टात आल्याने दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर मासेमारीचा हंगाम १ ऑगस्टपासून सुरू झाला. यामुळे राज्याच्या विविध किनार्यांवरील नौका दर्यावर स्वार झाल्या आहेत. मात्र हर्णे समुद्रकिनारी असणार्या छोट्या नौकांना अजून अनुकूल वातावरण न मिळाल्याने या नौका हवामानाच्या योग्य मुहूर्ताची बाट पाहत अद्याप किनार्यावरच आहेत. नारळी पौर्णिमेपर्यंत सर्व नौका सागरावर स्वार होतील, अशी माहिती कोळी बांधवांनी दिली आहे.
हर्णे मासेमारासाठी जगप्रसिद्ध बंदर आहे. येथे ३००पेक्षा अधिक छोट्या होड्या दररोज मासेमारी करतात. शासनाची १ जून ते ३० जुलै पर्यंत सर्व प्रकारच्या मासेमारीला बंदी असते. यामुळे या नौका समुद्रकिनारी नांगरुन ठेवण्यात येतात. आता सर्व प्रकारच्या मासेमारीवरील बंदीचा कालावधी संपुष्टात आला आहे.www.konkantoday.com