तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली, 20 वर्षात 23 वेळा ट्रान्सफर; महत्वाच्या खात्यावर सचिव म्हणून नियुक्त!

Maharashtra IAS Transfer : राज्यातील धडाडीचे आयएएस अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढेंची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. 20 वर्षांच्या सेवेत मुंडेंची 23 साव्यांदा बदली करण्यात आली आहे. नव्याने बदली करण्यात आल्यानंतर आता मुंढेंची दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे. मुंढे यांच्यासह राज्यातील पाच वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आली आहे.

कोणत्या अधिकाऱ्याची बदली कुठे?

  1. तुकाराम मुंढे (आयएएस: आरआर: 2005) विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई यांना सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
  2. नितीन काशीनाथ पाटील (आयएएस: एससीएस: 2007) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबई यांना विशेष आयुक्त, राज्य कर, महाराष्ट्र, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
  3. अभय महाजन (आयएएस: नॉन-एससीएस: 2007) विशेष आयुक्त, राज्य कर, महाराष्ट्र, मुंबई यांना व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
  4. ओंकार पवार (आयएएस: आरआर: 2022) सहाय्यक जिल्हाधिकारी, इगतपुरी उपविभाग, नाशिक यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
  5. आशा अफजल खान पठाण – सहसचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपूर यांना महासंचालक, वनमती, नागपूर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे आणि त्यांना सहसचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपूरचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

तुकाराम मुंडेंची आतापर्यंत झालेली बदली आणि खाती (२००५-२०२५ पर्यंत)

  1. ऑगस्ट २००५ – प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी, सोलापूर
  2. सप्टेंबर २००७ – उपजिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग
  3. जानेवारी २००८ – सीईओ, जिल्हा परिषद, नागपूर
  4. मार्च २००९ – आयुक्त, आदिवासी विभाग
  5. जुलै २००९ – सीईओ, वाशिम
  6. जून २०१० – सीईओ, कल्याण
  7. जून २०११ – जिल्हाधिकारी, जालना
  8. सप्टेंबर २०१२ – सहा आयुक्त विक्रीकर, मुंबई
  9. नोव्हेंबर २०१४ – जिल्हाधिकारी, सोलापूर
  10. मे २०१६ – आयुक्त, नवी मुंबई
  11. मार्च २०१७ – मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे
  12. फेब्रुवारी २०१८ – आयुक्त, नाशिक महापालिका
  13. नोव्हेंबर २०१८ – सहसचिव, नियोजन
  14. डिसेंबर २०१८ – प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई
  15. जानेवारी २०२० – आयुक्त, नागपूर महापालिका
  16. ऑगस्ट २०२० – सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई
  17. जानेवारी २०२१ – राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, भारत
  18. सप्टेंबर २०२२ – आयुक्त, आरोग्य सेवा आणि संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM)
  19. नोव्हेंबर २०२२ – अचानक बदली, प्रतीक्षेत ठेवण्यात आले (NHM चा कार्यकाल फक्त 2 महिने)
  20. एप्रिल २०२३ – सचिव, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभाग
  21. जून २, २०२३ – सचिव, मराठी भाषा विभाग
  22. जुलै २०२३ – कृषी आणि पशुसंवर्धन विभाग सचिव म्हणून बदली पुढे चालू राहिली.
  23. ऑगस्ट २०२५ – ५ ऑगस्ट २०२५ रोजी मुंडें यांची २३ व्यांदा बदली करण्यात आली असून त्यांना आता दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button