
स्मार्ट मीटरविरोधात ११ रोजी आयोगाकडे तक्रार करणार, सामाजिक कार्यकर्ते शौकत मुकादम
महाराष्ट्रामध्ये स्मार्ट मीटर वीज ग्राहकांच्या जबरदस्तीने माथी बारली जात आहे. याविरूद्ध विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांनी आवाज उठविला आहे. परंतु आता स्मार्ट मीटरविरोधात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळावर कायदेशीर लढा उभा केल्यावरच वीज ग्राहकांना न्याय मिळणार असल्याने ११ ऑगस्ट रोजी वीज नियामक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, स्मार्ट मीटर हा वीज ग्राहकांना फसवणून पैसे उकळण्याचा धंता महावितरण कंपनीने सुरू केला आहे. स्मार्ट मीटरला साधा हात लागला तरी विजेचे युनिट पडते एवढे ते नाजूक युनिट आहे. यामुळे ग्राहकांना भरमसाठ बिले येत आहेत. त्यामुळे स्मार्ट मीटर हे वीज ग्राहकांसाठी डोकेदुखी असल्याने या संबंधात महाराष्ट्र वीज नियामक आयोग यांच्याकडे आपण सोमवारी तक्रार दाखल करणार आहे. यामध्ये ग्राहकांना नक्की न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मुकादम यांनी सांगितले.www.konkantoday.com