
मंडणगड येथे चोरट्याने अंधाराचा फायदा घेत लांबवले ४८ हजारांचे खैर
रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी ४८ हजार किंमतीची खैराची ३५ झाडे चोरून नेल्याची तक्रार मंडणगड पोलीस ठाण्यात २ ऑगस्ट रोजी नोंदवण्यात आली आहे.
या संदर्भात जमीन मालक सुधीर सीताराम सोंडकर (५१, रा. कादवण देऊलवाडी) यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांनी ३१ जुलै रोजी केलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांनी ३१ जुलै रोजी सायंकाळी ४.३० ते १ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजण्याच्या कालावधीत फिर्यादीच्या कादवण देऊलवाडीमधील जागेतील १५० झाडांपैकी ३५ खैरांची मोठी झाडे तोडून चोरून नेली. या झाडांची बाजारभावाप्रमाणे किंमत अंदाजे ४८ हजार रुपये इतकी आहे.
www.konkantoday.com