
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशासाठी संस्थास्तरावर समुपदेशन आणि प्रत्यक्ष प्रवेश फेरी
रत्नागिरी, दि. 4 ):- कॅम्प राऊंड 4 नंतर रिक्त राहिलेल्या जागांसाठी प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकीच्या प्रवेशाकरिता (प्रवेश 2025-26) संस्थास्तरावर समुपदेशन आणि प्रत्यक्ष प्रवेश फेरी आयोजित करण्यात आली आहे. प्रथम वर्ष डिप्लोमा अभियांत्रिकीसाठी ११ आणि १४ ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता, तर थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा अभियांत्रिकीसाठी 12 आणि 14 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता उपस्थित रहावे. पात्रता निकष आणि सविस्तर वेळापत्रक 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30 वाजता संस्थेच्या वेबसाइट www.gpratnagiri.org आणि सूचना फलकावर उपलब्ध होईल. समुपदेशन फेरीला उपस्थित राहिल्याने जागा मिळेलच याची कोणतीही हमी नसल्याचेही सूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. इच्छुकांनी वेळेवर उपस्थित राहून प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय यांनी केले आहे.