
जात प्रमाणपत्र पडताळणीमध्ये त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आवाहन
रत्नागिरी, दि. 4 ) : ज्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच नीट, सीईटी , क्लॅट व जेईई ( परीक्षा दिल्या आहेत आणि ज्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी समिती कार्यालयामध्ये अर्ज दाखल केलेला आहे, पण त्यांच्या प्रस्तावांमध्ये त्रुटी असल्यामुळे अद्याप जात वैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना जाहीर करण्यात आली आहे. अशा विद्यार्थ्यांनी ११ ऑगस्ट २०२५ ते १४ ऑगस्ट २०२५ या कालावधीमध्ये समिती कार्यालयाशी व्यक्तीशः अथवा पालकांमार्फत संपर्क साधून प्राधान्याने आपल्या अर्जातील त्रुटींची पूर्तता करावी. जेणेकरुन समितीला सदर प्रकरणांवर गुणवत्तेनुसार निर्णय घेतला जाईल, असे समितीने स्पष्ट केले आहे. अर्जदारांनी त्रुटी पूर्ततेसाठी कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीशी संपर्क साधू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. अर्जदार किंवा त्यांचे कुटुंबीय यांनी समिती कार्यालयामध्ये त्रुटी पूर्ततेसाठी स्वतः उपस्थित राहून कार्यवाही करावी, असे अपर जिल्हाधिकारी (नि.श्रे.) तथा अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी कळविले आहे.