अमली पदार्थ बाळगणाऱ्या एकाला अटक

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याची कारवाई

रत्नागिरी : शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोकण नगर प्रशांत नगर येथे गांजा सदृश्य अमली पदार्थ विक्रीस आणल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्याच्या गस्तीपथकाने एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. सत्यजित सदाशिव जाधव (वय ३३, सध्या रा. नाचणकर चाळ, एमआयडीसी, ता. जि. रत्नागिरी, मूळ रा. 22/1414, विकास नगर, स्टेशन रोड, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) याला अटक करण्यात आले असून, त्याच्याकडून ३१ हजार रुपये किंमतीच्या अमली पदार्थासह ९६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यामध्ये अमली पदार्थांना प्रतिबंध व कारवाई करण्याचे अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी सर्व पोलीस ठाणे यांना सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ३ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजण्याच्या वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे एक पथक शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोकणनगर ते प्रशांत नगर येथे गस्त घालत असताना एक इसम आपल्या दुचाकीवर बसून संशयित हालचाली करत असताना दिसून आला.

या पथकाला त्याचा संशय आल्याने त्याच्या ताब्यातील साहित्याची खात्री करण्यासाठी दोन पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्या ताब्यातील निळ्या रंगाच्या प्लॅस्टिक पिशवीमध्ये काळपट हिरवट रंगाची पाने, फुले, काड्या व बोडे असलेल्या वनस्पतीचे शेंडे असलेला उग्र वासाचा “गांजा” सदृश्य अमली पदार्थ मिळून आला.

याप्रकरणी सत्यजित सदाशिव जाधव (वय ३३, सध्या रा. नाचणकर चाळ, एमआयडीसी, ता. जि. रत्नागिरी, मूळ रा. 22/1414, विकास नगर, स्टेशन रोड, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे असून त्याने विक्रीसाठी ताब्यात बाळगलेला ३१ हजार रुपये किंमतीचा 695.5 ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अमली पदार्थ तसेच एक ६५ हजारांची ज्युपिटर गाडी (एमएच-१२-एमझेड-८४९२) व इतर मुद्देमाल असा एकूण ९६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सत्यजित जाधव याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्ट १९८५ चे कलम ८ (क), २० (ब), (ii) (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, सहाय्यक पोलीस फौजदार दीपक साळवी, पोलीस हवालदार पंकज पडेलकर, पोलीस हवालदार आशीष भालेकर, पोलीस हवालदार प्रशांत पाटील, पोलीस हवालदार अमोल भोसले, पोलीस हवालदार अमित पालवे व पोलीस कॉन्स्टेबल प्रथमेश क्षीरसागर, (फॉरेन्सिक विभाग), पोलीस कॉन्स्टेबल संदीप हतकर (फॉरेन्सिक विभाग) यांनी बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button