
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुहागर तालुक्यात विकास कामांचा धडाका
गुहागर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विकास कामांचा धडाका सुरू झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या निधीतून अंजनवेल भोईवाडी येथे बोरवेल मारण्यात आली असून या बोरवेलचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागर तालुका अध्यक्ष साहिल आरेकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सेक्रेटरी संतोष जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष मंजूर बंगी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पडवे जिल्हा परिषद गट अध्यक्ष तुषार सुर्वे, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे उपाध्यक्ष श्रीधर बागकर, मुक्तार लांबले, कादीर पांगारकर, आत्माराम सैतवडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.