
मालगुंड ग्रामपंचायतीकडून प्राथमिक आरोग्य केंद्राला वॉटर कुलर भेट
मालगुंड (ता. रत्नागिरी) – मालगुंड ग्रामपंचायतीने सामाजिक भान जपत एक स्तुत्य उपक्रम राबवत प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड ला वॉटर कुलर भेट दिला आहे. ग्रामस्थांच्या आरोग्याच्या सोयीसाठी ग्रामपंचायतीकडून नेहमीच सक्रिय सहकार्य दिले जाते, त्याच परंपरेत या उपक्रमाची भर पडली आहे.
या वॉटर कुलरमुळे आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना आणि कर्मचाऱ्यांना उन्हाळ्यात शुद्ध व थंड पाणी उपलब्ध होणार आहे. सरपंच श्रीम. स्वेता खेऊर, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत हा वॉटर कुलर आरोग्य केंद्राच्या प्रमुखांच्या स्वाधीन करण्यात आला.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा जाधव व डॉ सुनीता पवार यांनी ग्रामपंचायतीचे आभार मानत सांगितले की, “मालगुंड ग्रामपंचायतीकडून वेळोवेळी आरोग्य सेवेसाठी मोलाचे सहकार्य मिळत असून हा वॉटर कुलर त्याचेच उत्तम उदाहरण आहे.”
ग्रामपंचायतीचा हा उपक्रम खर्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपणारा असून, इतर ग्रामपंचायतींसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.